शहरातील काही युवकांकडून एका युवकाला मारहाण…

प्रकरण पोलिस स्थानकात

सावंतवाडी ता.१०-: शहरातील 3 ते 4 युवकांकडून एक तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार आज सायंकाळी उशिरा शहरातील एका बिल्डिंग परिसरात घडला. संबंधित सर्व जण हे शहरातीलच असल्याची माहिती प्राप्त झाली असून, हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यात गेला आहे. याबाबतची पुढील प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. तर त्या मारहाण करणाऱ्या युवकांकडून घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना देखील उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

उपलब्ध माहिती नुसार हा मारहाणीचा प्रकार काही पैशाच्या देवाण घेवणीच्या कारणातून झाल्याचे समोर आले आहे. संबंधित 3 ते 4 युवकांकडून आज सायंकाळी अचानक शहरातील एका बिल्डिंग पाशी येऊन तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यात त्या तरुणांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्या मुलाला देखील संबंधितांकडून मारहाण करण्यात आली. घटनास्थळी वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

You cannot copy content of this page