वेंगुर्ले नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून अमरावती आयुक्तांवरील शाईफेक कृत्याचा निषेध…

*वेंगुर्ले,ता.१०:* अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाई फेक कृत्याचा वेंगुर्ले नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात आला. यावेळी काळ्या फिती लावून त्यांनी आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवले होते.

यावेळी कार्यालयीन अधीक्षक संगिता कुबल, कर्मचारी संघटनेचे निशा आळवे, सचिन काकड, अभिजीत गिरप, आनंद परब, वैभव म्हाकवेकर, शैलेश सातार्डेकर, विठ्ठल सोकटे, मंदार चौकेकर आदींसह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर जमावाने शाई फेकून त्यांना धक्काबुक्की केली या कृत्याचा वेंगुर्ले न.पं.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून जाहीरपणे निषेध करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page