मी बोललो तर अनेकांचा ‘बीपी’ वाढेल

नितेश राणे;तपासकार्यात सहकार्य म्हणून शरण आल्याचा केला खुलासा

सावंतवाडी ता.१०: ज़िल्हा बँक निवडणुकीतील तथाकथित हल्ला प्रकरणात मला नाहक गोवण्याचा प्रयत्न झाला. पण मला अटक करणे कोणाला शक्य झाले नाही. जनतेला त्रास नको आणि तपासकार्यात अडथळा नको म्हणून मी स्वतः पोलिसाना शरण आलो आहे, असे स्पष्टीकरण आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले.

मी तोंड उघडले तर अनेकांचा ‘बीपी’ वाढेल, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी विरोधकांवर केला. दरम्यान, आपल्याला रक्तदाबाचा त्रास असून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

You cannot copy content of this page