कणकवली ता.०७-:* सुमारे सव्वा पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उल्टी तस्करीच्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केलेल्या तिघा जनांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस . व्ही . हांडे यांनी प्रत्येकी २५ हजारच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले .
संशयितांच्यावतीने अॅड . उमेश सावंत , अॅड . अविनाश परब , अॅड . पंकज आपटे , अॅड . सुहास साटम यांनी काम पाहिले . स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळालेल्या माहितीच्या आधारे दि ११ डिसेंबर २०२१ रोजी संशयीत आरोपी कॉन्स्टटिनो फिलोमिनो फर्नांडीस , जुजू जोस पेरीस व तनीश उदय राऊत तिघेही रा . सालसेद गोवा हे एकमेकाच्या संगनमताने व सहाय्याने स्विप्ट डिझायर कार व हिरो स्पेंडर दुचाकीचा वापर करून पाच किलो व्हेल माशाची उल्टी ( अंबरग्रीस ) विक्री करण्यास जात होते . फिर्यादीप्रमाणे बांद्याच्या गांधीचौकात कॉन्स्टटिनो व जुजू हे स्विप्ट कार घेऊन आले . त्यावेळी पोलीस अधिकारी व पंच यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता ते व्हेल माशाची उल्टी विक्री करण्यासाठी आल्याचे कळले . त्यानंतर आरोपी कॉन्स्टटिनो याने मोबाईलद्वारे आरोपी तनीश राऊत याला फोन केला व घटनास्थळी बोलावून घेतले . तो दुचाकीद्वारे आला त्यावेळी त्याच्या ताब्यात व्हेल माशाच्या उल्टीसदृश्य पदार्थ मिळून आला . त्याचे वजन केले असता तो पाच किलो २३२ ग्रॅम असल्याचे आडळले . आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे सव्वापाच कोटी असल्याचे निष्पन्न झाले . आरोपींविरूद्ध स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेमार्फ धुरी यांनी वन्य जिव संरक्षण कायदा कलम ९ , ३९ , ४२ , ४३ , ४४ , ४८ , ५१ नुसार गुन्हा दाखल केला आरोपींना अटक करून चार दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली . त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होते . गुन्ह्याच्या तपासात टोनी डायस रा . चांदेर गोवा याच्याकडून हा मुद्देमाल आरोपींनी मिळविल्याचे स्पष्ट झाले . मात्र , त्याचे कोरोनात निधन झाले होते . दरम्यान , सावंतवाडी न्यायालयाने सर्व आरोपींचा जामिन फेटाळला होता . त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते . त्याची सुनावणी होऊन तीनही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले .
