ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांचे संजू परब यांना प्रतिउत्तर
सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी नगरपालिकेतील आमचा कार्यकाळ जरी संपलेला असला तरीदेखील शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही लोक प्रतिनिधी म्हणून कटिबंध आहोत. याचे भान माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी ठेवावे. कार्यकाळ संपला म्हणजे आपले काम देखील संपले हा गैरसमज त्यानी आपल्या मनातून काढून टाकावा. असे प्रतिउत्तर माजी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी दिले आहे.
ते पुढे बोलताना म्हणाल प्रतिनिधी हा लोकांसाठी कायम काम करत असतो, हे जर माजी नगराध्यक्ष संजू परब यांना समजत नसेल तर त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे देखील सांगितले आहे.
