*कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी संस्थेच्या मार्फत दशक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उत्पादित भात खरेदीचा शुभारंभ नुकताच संस्थेचे चेअरमन रवींद्र जठार यांच्या हस्ते सोसायटीत करण्यात आला. खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीच्या वतीने दरवर्षी खारेपाटण परिसरातील शेतकऱ्यांचे भात योग्य दरात खरेदी केले जाते.
याहीवर्षीही संस्थेने भात खरेदी सुरू केली असून खारेपाटण परिसरातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन रवींद्र जठार यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेंद्र कोरगांवकर, ज्येष्ठ संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, अशोक पाटील,श्रीधर गुरव,मोहन पगारे, संचालिका तृप्ती माळवदे,महिला कार्यकर्त्या श्रीम.साधना धुमाळे,सचिव अतुल कर्ले,क्लर्क अस्मिता ढेकणे, सेल्समन धोंडीराम साटविलकर, माहमूद ठाकूर,अमित पाटणकर आदी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
