कणकवली ता.०७-:* किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग आयोजित राष्ट्रीय सह्याद्री गड – किल्ले कला, साहित्य संमेलन, सिंधुदुर्ग चे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्राच्या विकासात भरीव योगदान देऊन इतिहास रचणाऱ्या निवडक व्यक्ती व संस्थाचा सत्कार सोहळ्या पद्मश्री पुरस्कार 2021 विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पिंगुळी कला आंगण विश्राम पपेट थिएटर्स मुंबई – गोवा हायवेलगत रविवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा. संपन्न होणार आहे,
या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना व संस्थांना गौरविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय कर्तृव्य जीवनगौरव,महाराष्ट्र सह्याद्री लोकगौरव,सह्याद्री हिरकणी अशा नावाने सन्मानित करण्यात येणार आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग (मो. नं. 94 21 18 98 21) यांनी केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली संपूर्ण माहिती संयोजकांकडे 12 फेब्रुवारी पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.पहिल्या येणाऱ्या 50 व्यक्तींना सहभागी करून घेतले जाणार आहे.असे आयोजकांतर्फे जाहिर करण्यात आले आहे.
