…आणि मैत्री परिवाराचा आनंद सोहळा रंगला निसर्गाच्या सानिध्यात

कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर

कणकवली ता.०७-:* कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे दुसरे गेट टुगेदर निसर्गाच्या सानिध्यात तळाशील (ता.मालवण) समुद्र किनारी सुरूच्या बनात संपन्न झाले.मैत्री परिवाराचे दोन दिवसांचे गेट टुगेदर ठरले चांगलेच यादगार. मागील वर्षी जानेवारी महिन्यात तब्बल पंचवीस वर्षानंतर गेटटूगेदरच्या निमित्ताने काॅलेजमधील मित्रमैत्रिणींची पहिली भेट पहिल्या गेटटूगेदरच्या वेळी रुपाली रिसाॅर्ट पिसेकामते येथे झाली होती.त्यानंतर लाॅकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाले. मुंबई,पुणे तसेच दूर अंतरावरावरुन तसेच जिल्ह्यातील विविध भागामध्ये नोकरी,धंदा,व्यवसाय यामध्ये बिझी असणाऱ्या मित्रमैत्रिणी निव्वळ मैत्रीच्या ओढीने एकत्रित झाल्या होत्या. पहिल्या दिवसाची सुरुवात वर्षभरात ज्या मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस झाले त्या सर्वांचा एकत्रितपणे वाढदिवस साजरा करुन मैत्री परिवाराचा केक बनवून आणून तो कापण्यात आला.

मात्र या सगळ्यात कार्यक्रमस्थळी स्टेजवरती लावण्यात आलेला मैत्री परिवाराचा “रक्ता पलिकडचं नातं…मैत्रीचं”हा भला मोठा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. फनी गेममध्ये चिट्टी उचलून अभिनय,किंवा कूती सादर करण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला.तकरावकेवरती एकापेक्षा एक सदाबहार हिंदी मराठी गाण्याची मैफिल तसेच गाण्यांच्या भेंड्या घेण्यात आल्या.यामध्ये महेंद्र सांब्रेकर,सरिता काणेकर,विजयश्री कोदे,शंकर गोसावी,उल्हास तारी,गीता पाटकर,विशाखा वळंजू-कोळवणकर,वैशाली सावंत,अर्चना मोरजकर यांनी सुंदर गाण्याची पेशकश सादर केली.तसेच अर्चना मोरजकर-माणगावकर हीने शिट्टीवरती गायलेले सुंदर गाण्याने आपल्यातील वेगळ्या कलेची चुणूक दाखवून दिली.संपूर्ण कार्यक्रमांसाठी साऊंड सिस्टिमचे व्यवस्था पाहणारे दयानंद पेडणेकर यांचीही उत्तम साथ लाभली. मैत्री परिवारातील मित्र अजित लाड याने अजय वाळके आणि जयराम डामरे या दोन मित्रांना आयत्यावेळी सोबत घेऊन अप्रतिम असे दशावतारी नाटक वेशभूषेसह सादर केले.

मैत्रीवर रंगलेल्या काव्य मैफिलीत मैत्रीचा अक्षरशः पाऊस पडला.यात महेंद्र कदम,जयराम डामरे,मनोज निग्रे,संजय खानविलकर,गीता पाटकर यांनी एकापेक्षा एक कवीता,चारोळ्या सादर करुन सर्वांचे चांगले मनोरंजन केले. या गेटटूगेदरमध्ये प्रामुख्याने महेंद्र सांब्रेकर,जयराम डांबरे,महेश मर्गंज,उल्हास तारी,शांताराम पाताडे,अजय वाळके,संजय सावंत,लक्ष्मण मोंडकर,शरद राणे,सुरेश ऊर्फ दादा मांजरेकर,संतोष तळेकर,मधुसुदन राणे,अजित लाड,मनोज निग्रे,संतोष दळवी,महादेव तेली,संतोष तवटे,विश्वास जाधव,शंकर गोसावी,आत्माराम पडते,महेंद्र कदम,सुबोध कुडतरकर,प्रितम वाळके,प्रेमनाथ नांदोडकर,राजेंद्र हिंदळेकर,किशोर राऊत,रवीकांत नाईक,मनोज सावंत,संतोष घाडीगावकर,रामचंद्र सुकाळे, राजेंद्र पारकर,विनायक कुडतरकर,संजय खानविलकर,समीता मुंज-ढवण,विजयश्री सावंत- कोदे,सरिता काणेकर,सुषमा पाटील,सुजाता नलावडे,अर्चना मोरजकर-माणगावकर,गीता पाटकर-पई , विशाखा वळंजू-कोळवणकर ,वैशाली सावंत,साधना मुंज,छाया फणसळकर,प्रणिता गावडे,ज्योत्स्ना मेस्त्री,मीना पारकर,प्रिती डाकवे,वनिता मुंज,सायली लाडगावकर, आदी मैत्री परिवारातील मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page