सामाजिक कार्याचा सन्मान करण्याचे प्रवासी संघाचे कार्य कौतुकास्पद:डॉ.विद्याधर तायशेटे

कणकवली प्रवासी संघाचा पुरस्काराचा वितरण सोहळा उत्साहात

कणकवली ७ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- प्रवाशांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम प्रामाणिकपणे कणकवली प्रवासी संघातर्फे केले जात आहे . त्याचे हे काम कौतुकास्पद आहे . कोरोनाच्या काळात सामाजिक , शैक्षिणक , आरोग्य , राजकीय क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा प्रवासी संघाचा उपक्रम स्तुत्य आहे . तसेच प्रवासी संघाच्या कार्यात तरुण पिढीला सहभागी करुन घ्यावे , असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केले . राष्ट्रीय प्रवासी दिनानिमित्त व रथसप्तमीचे औचित्यसाधून कणकवली प्रवासी संघाचा पुरस्काराचा वितरण सोहळा कणकवलीतील महाराजा सभागृहात आयोजित केला होता . या सोहळ्याप्रसंगी डॉ . तायशेटे बोलत होते . यावेळी तहसीलदार रमेश पवार , पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर , सचिव रवींद्रनाथ मुसळे कणकवली तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर , उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे , सचिव श्रद्धा कदम , कायदे विषयक सल्लागार अॅड . संदीप राणे आदी मान्यवर उपस्थित होते . तहसीलदार आर . जे . पवार म्हणाले , प्रवाशांच्या न्याय व हक्कांसाठी झटणारी कणकवली प्रवासी संघ ही एकमेव संघटना आहे . या संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे .

तसेच कोरोनाच्या काळात कोविड विषयक नियमांचे पालन जनतेने काटेकोरपणे केल्यामुळे कोरोनाची परिस्थिती निवळली आहे . कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीत एक वेगळा प्रवास अनुभवला . पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर म्हणाले , प्रवाशांच्या हितासाठी प्रवासी संघ कार्य करीत आहेत . प्रवाशांनी आपल्या हक्कांबाबत जागृत असले पाहिजे . प्रवास करताना प्रवाशांनी संरक्षण विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे . तसेच एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होते आहे . हे प्रवाशांचे हाल थांबविण्यासाठी एसटीच्या कामगारांना संप मागे घेण्याची विनंती प्रवासी संघाने करावी , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

अशोक करंबेळकर , दादा कुडतरकर यांनी मनोगते व्यक्त केली . यावेळी नवोदित कवी अरुण इंगळे यांचा सन्मान करण्यात आला . प्रस्ताविक मनोहर पालयेकर यांनी केले . सूत्रसंचालन रवींद्रनाथ मुसळे यांनी केले . आभार श्रद्धा कदम यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष राणे , शुभदा पालेकर , योगेश मुंज,अमित मयेकर , राजाभाऊ परब , बाळा वाळके , प्रमोद लिमये , अरुण इंगळे , सौ . जाधव यांनी मेहनत घेतली . कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यात कणकवली तालुका पत्रकार समिती , कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समिती यांच्यासह आरोग्यसेविका नयना मुसळे , आरोग्यसेवक प्रशांत बुचडे , दिविजा आश्रमाच्या दीपिका रांबाडे , नीलेश चिंदरकर , वाहतूक पोलीस चंद्रकांत माने , समीक्षा खानोलकर यांचा समावेश होता . वृद्धाश्रमातील वृद्धांना त्यांच्यासोबत वेळ घालवणारी व त्यांच्या गप्पागोष्टी करणारी माणसांची आवश्यकता असते . हे त्यांच्या जगण्याचे खरे टॉनिक आहे . हे टॉनिक पुरवण्यासाठी नागरिकांनी वृद्धाश्रमात येऊन वृद्धांबरोबर वेळ घालवून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधावा . याशिवाय असलदेतील दिविजा आश्रमाशी नागरिकांनी कनेक्ट होऊन परोपकारीवृत्तीने मदतीचा हातभार लावावा , अशी अपेक्षा दीपिका रांबाडे यांनी केली .

You cannot copy content of this page