सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबईचे आयोजन;कुडाळ येथील स्नेहमेळाव्यात करणार सन्मान
सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली अशा गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन संस्थेच्या कुडाळ येथील स्नेहसंमेलनात गौरवण्यात येणार आहे.संस्थेचे जिल्हा स्नेहसंमेलन रविवार दिनांक 6 मार्च रोजी संस्थेच्या कुडाळ येथील पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी – मार्च 2021च्या वर्षात इयत्ता पाचवी व आठवी या स्तरावरील शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त केली अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे तरी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी गुणगौरवासाठी आपल्या मुलांच्या शिष्यवृत्ती गुणपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती पूर्ण नाव व पत्त्यासह संस्थेच्या कुडाळ येथील कार्यालयात 25 फेब्रुवारी पर्यंत जमा कराव्यात असे आवाहन सावंतवाडी स्थानिक समिती कार्याध्यक्ष व्ही बी नाईक व कुडाळ समितीचे कार्याध्यक्ष रेखा राऊळ यांनी केले आहे
