माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचे आवाहन
सावंतवाडी ता.०७-:* आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या आमदारकीच्या १२ वर्षात सावंतवाडी तालुक्यात कोणती विकास कामे केली ती जाहीर करावीत. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमदार दिपक केसरकर यांनी समोरासमोर यावे असे जाहीर आवाहन माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी आमदार दीपक केसरकर यांना आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे.
