केसरकरानी कितीही वलंगणा केल्या तरी आगामी निवडणुकीत सावंतवाडीत भाजपचीच सत्ता…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा दावा.

सावंतवाडी ता.०६-:* नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर आम केसरकर भुरट्या लोकांना घेऊन फक्त विकासाच्या वलंगणा करत आहेत. परंतु या भुलथापाना जनता बळी पडणार नसून सावंतवाडी नगरपालिका ही भाजपची असणार असा दावा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला

पालिकेचा कार्यकाळ संपला असला तरी देखील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक पालिकेत जाऊन बसतात, बैठका घेतात याला मुख्याधिकारी काहीच बोलत नाहीत. मुख्याधिकाऱ्यानी जर हे बंद नाही केले तर आमचे नगरसेवक देखील त्या ठिकाणी जाऊन बसतील असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

You cannot copy content of this page