माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा मुख्याधिकाऱ्याना सवाल…
*⚡सावंतवाडी ता.०७-:* मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी काल मोती तलावात जलसफरचे आयोजन केवळ फक्त प्रतिष्ठित लोकांसाठीच का केले? सर्वसामान्यांसाठी का नाही असा सवाल माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी उपस्थित केला आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपच्या वतीने त्यानी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर व दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक राजू बेग, बंटी पुरोहित उपस्थित होते
