अखेर अधिक उपचारासाठी आ राणेंना हलविले कोल्हापूरला

ओरोस ता ७ न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आ नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयातून नेण्यात आले आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी कणकवली न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठज दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने ५ रोजी त्यांना कोल्हापूर शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज अचानक त्यांना कोल्हापूर येथे नेण्याचा निर्णय घेत १०८ रुग्णवाहिकेने नेण्यात येत आहे. काही वेळा पूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे.

सोबत दिक्टरांचे पथक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, नेमका कोणता आजार आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी व्हीसीमध्ये असल्याचे सांगत भेट देण्यास नाकारले.

You cannot copy content of this page