कुडाळ ता.०७-:* कोकणचे सुपुत्र, सुप्रसिद्ध दशावतार कलाकार, ‘लोकराजा’ सुधीर कलिंगण यांचे आज पहाटे २ च्या सुमारास निधन झाले. त्यांना गोवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या जाण्याने दशावतार कलेने एक अष्टपैलू कलाकार गमावला असून त्यांचे सहकारी, चाहते आणि कलिंगण परिवाराला धक्का बसला आहे.
