वेंगुर्ले वेंगुर्ले तालुक्यात शहरासह विविध ठिकाणी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज श्री गणेश जयंती निमित्त २१ गणपतींचे पूजन करण्यात आले. यावेळी २१ गणेश याग करण्यात आले. या गणपतींचे उद्या शनिवारी विसर्जन होणार असून रविवारी महाप्रसाद होणार आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. वेंगुर्ले तालुक्यात श्री देव रामेश्वर मंदिर, रेडी येथील द्विभुज गणपती मंदिर, उभादांडा येथील प्रसिद्ध व जागृत श्री गणपती मंदिर, जुना एस.टी. स्टॅन्ड येथील श्री गणपती मंदिर, वेंगुर्ले कॅम्प येथील खरेदी-विक्री संघानजीक वरदविनायक मंदिर, नवाबाग, वायंगणी गणपती मंदिर, दाभोली तसेच तालुक्यात अन्य विविध ठिकाणी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला.यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
तालुक्यात गणेश जयंती उत्साहात साजरी…
