महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोती तलावाच्याकाठी “खाऊ गल्ली” उभारणार

आमदार दीपक केसरकर : केशवसुत कट्ट्याला नवा लूक तर नव्याने तुतारी देखील बांधण्यात येणार!

सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी येथील केशवसुत कट्ट्याला नवा लूक देण्यात येणार असून, त्या ठिकाणी नव्याने तुतारी देखील बांधण्यात येणार आहे. तसेच यावेळी मोती तलावाच्या काठावर माजी नगराध्यक्ष कै दत्ताराम वाडकर यांच्या नावाने महिलांना सक्षम करण्यासाठी खाऊ गल्ली उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.

यावेळी सांगली येथील वालचंद महाविद्यालयांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले आहे. आज सायंकाळी त्यानी वास्तुविशारद अमित कामंत यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर यांनी त्या जागेची पाहणी केली आहे. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page