सावंतवाडी रेल्वेस्थानकाला छत्रपती संभाजी राजे नाव द्या

श्री देव उपरलकर उत्सवनिमित्त स्वराज्य संघटनेची स्वाक्षरी मोहीम;रक्तदान शिबिराचे सुद्धा केले होते आयोजन

सावंतवाडी : श्री देव उपरलकर वार्षिक उत्सवा निमित्त सावंतवाडी शहरात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, तर रक्ततपासणी शिबिर आयोजित केले.

या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहेच. त्यांचे शौर्य, राष्ट्रप्रेम, शत्रूपासून स्वराज्य रक्षण, जीवनातील सर्व युध्दांत विजय तसेच वयान १६ व्या वर्षी संस्कृत भाषेतील ‘बुधभुषणम् ग्रंथ रचना’ इ. कार्याची जाण आहेच. भारताच्या अशा वीर सुपुत्राचे नाव कोंकण रेल्वे अंतर्गत येणा-या सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकांस देवून त्यांच्या स्मृतीस श्रध्दासुमन अर्पित करावं. हे स्मारक पिढ्यांना प्रेरणास्त्रोत असेल असं पत्र लिहिण्यात आले आहे. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज टर्मिनस करावे अशी मागणी रेल्वे मंत्री यांच्याकडे केली असून यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहीमेस तुफान प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक तरुण-तरुणी गोव्यात नोकरी निमित्त ये-जा करतात. त्यांच्या सोईच्या वेळेनुसार, म्हणजेच सकाळी कणकवली ते मडगांव व सायंकाळी कणकवली अशी रेल्वे सेवा सुरु करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्यातून याच ठिकाणी रक्ततपासणी देखील करण्यात येत आहे. यासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, अनिल खाडे यांच सहकार्य लाभले. यावेळी अमोल साटेलकर, सु़धीर आडिवरेकर, अँड राजू कासकर, श्रीपाद सावंत, सुनिल पेडणेकर, देव्या सुर्याजी, गौतम माठेकर, मेहर पडते, संदीप धुरी, उमेश कोरगावकर, दिनेश गावडे, कृष्णा धुळपणावर, अंकित तेंडोलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page