श्री देव उपरलकर वार्षिक उत्सवाला अलोट गर्दी

महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातील हजारो भाविक झाले लिन

सावंतवाडी : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान ३६५ खेड्यांचा अधिपती श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव थाटात पार पडला. या उत्सवा निमित्त गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भक्तगण श्री देव उपरलकर चरणी लीन झाले.

कोव्हीड नियमांच पालन करत हा सोहळा पार पडला. हाकेला धावणारा.. नवसाला पावणारा..३६५ खेड्यांचा अधिपती आणि जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या सावंतवाडी येथील श्री देव उपरलकरचा वार्षिक उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला. पहाटे अभिषेक पूजा करण्यात आली. देवाला नेसवलेल्या वस्त्रांमुळे त्यांचे रूप पाहून भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. सकाळपासून देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळींसह भाविक उपरलकर चरणी लीन झाले.

सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवनिमित्त सायंकाळी पूजापाठ, भजन आरती, भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद, नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळचा नाट्यप्रयोग होणार आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर भाविकांनी सोशल डिस्टनन्सिंग, मास्कचा वापर व कोरोना नियमावलीचे पालन करण्यात येत होते. . यावेळी देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप उपस्थित होते.

You cannot copy content of this page