चौकशीसाठी आम. नितेश राणे यांना आणले कणकवली पोलीस ठाण्यात

कणकवली 3 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी सकाळी १०. १५ वाजता कणकवलीत पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आणण्यात आले होते. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे ,सागर खंडागळे आदी अधिकारी उपस्थित आहेत.

नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई हे पोलीस स्थानकात उपस्थित आहेत.काल रात्री उशिरा त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.त्यानंतर त्यांना आज सकाळी कणकवलीत आणण्यात आले आहे . त्याची पुन्हा कणकवली पोलीस स्थानकात चौकशी केली जात आहे.

You cannot copy content of this page