आदर्श जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे आरोग्य सुरक्षा साहित्याचे वाटप

कणकवली 3 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता दक्षता म्हणून मास्क, सॅनिटायजर, हँडवॉश इ. आरोग्य सुरक्षा साहित्याचे वाटप तळेरे ग्रामपंचायत यांच्यावतीने स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार करण्यात आले.

याप्रसंगी तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पद्मजा करंदीकर, सहा. शिक्षक श्रीराम विभूते, शैलेश सुर्वे हे उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये याकरिता नेमून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सर्वतोपरी दक्षता व काळजी घेण्याबाबतचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव यांनी सर्व शिक्षक व पालकवर्ग यांना केले. तळेरे ग्रामपंचायतीचे शाळेच्या व व्यवस्थापन समितीच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page