प्रज्ञांगण’ च्यावतीने शिवजयंती निमीत्त जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

कणकवली 3 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- तळेरे येथील प्रज्ञांगण संस्थेकडून शिवजयंतीनिमीत्त जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या दोन्हीही स्पर्धेसाठी शिवराज्याभिषेक, शिवरायांचे किल्ले, शिवराय तुकाराम भेट, रायरेश्वर चरणी शपथ, शिवराय जिजाऊ, शिवरायांचे पराक्रम असे सहा विषय असून यातील एका विषयासह स्पर्धक स्पर्धेत सहभाग घेऊ शकतो. वक्तृत्व स्पर्धा 5 वी ते 8 वी आणि 9 वी ते 12 वी अशा दोन गटात होणार आहे. यास्पर्धेत पहिल्या 20 स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. त्यासाठी तीन मिनिटांची वेळ आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीला सकाळी 9 वा. ‘प्रज्ञांगण’ तळेरे येथे होईल. यातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तर चित्रकला स्पर्धा 5 वी ते 7 वी, 8 वी ते 12 वी व खुलागट अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी शालेय गटातील स्पर्धकांनी ए4 कागदावर तर खुल्या गटातील स्पर्धकांनी ए3 कागदावर चित्र काढून ‘प्रज्ञांगण’, महालक्ष्मी प्लाझा, तळेरे डोंगरे दुकानाच्या बाजूला, मुंबई गोवा महामार्ग, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे 15 फेब्रुवारी पर्यंत समक्ष आणून द्यावे अथवा पोस्टाने पाठवावे. या स्पर्धेत सहभागासाठी पहिल्या गटाला रु. 25, दुसर्या गटाला रु. 50 आणि तिसरया गटाला रु. 100 प्रवेश शुल्क असून सदरचे प्रवेश शुल्क 9405928865 या नंबरवर गूगल पे करावे. या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या दोन्हीही स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ 19 फेब्रुवारीला ‘प्रज्ञांगण’ मध्ये आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. या दोन्हीही स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रज्ञांगण कडून करण्यात आले आहे. 

You cannot copy content of this page