आंबेली येथे कारला भीषण अपघात…

तीन युवकांना गंभीर दुखापद…

दोडामार्ग ता.०३ सुमित दळवी-:* दोडामार्ग तिलारी मुख्य राज्य मार्गावर आंबेली – नजीक रात्रीच्या सुमारास कारचा भीषण अपघात घडला या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात तीन युवकांना गंभीर दुखापत झाली असून पं.स. सदस्य बाबुराव धुरी व इतरांच्या मदतीने जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे युवक साटेली भेडशी येथील असल्याचे पं.स.सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी अपघाताच्या ठीकाणावरुन १०८ ला कॉल करण्यात आला होता मात्र वेळेत न पोचल्याने पं.स.सदस्य बाबुराव धुरी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page