बजेटमध्ये करोडोंच्या घोषणा तरीही सामान्य जनतेच्या पदरी निराशा – अरविंद मोंडकर

मालवण (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने जनतेला फक्त आश्वासनाच गाजर दाखवलं व जाहीर केलेल्या बजेट मधून या गाजराचा हलवा बनवण्याच्या वलग्ना दाखवण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांना या बजेट मधून काहीतरी दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु फक्त करोडोंच्या घोषणा करत पुन्हा सामान्य जनतेच्या पदरी निराशा देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सबका साथ सबका विकास म्हणत मोदी सरकारने सामान्य भारतीय नागरिकांना कर्जाच्या खाईत ढकलले आहे. आठ वर्षापूर्वी मोदींच्या प्रलोभनाला आश्वासन मानून जनतेने भाजपच्या हातात सत्ता दिली. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी कोट्यावधी तरुणांना रोजगार देऊ असे सांगितले होते.

मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये ६० लाख नव्या नोकऱ्या देऊ, असे म्हटले आहे. आठ वर्षांपूर्वी मोदींनी केलेले विधान आणि आता अर्थमंत्री यांनी केलेल विधान यात फरक आहे. अशाप्रकारे फक्त थापा मारायच्या बाबतीत मोदी सरकार पुढे आहे, अशी टीकाही अरविंद मोंडकर यांनी केली आहे. लहान – मोठे व्यवसाय, दळण- वळण, यावर करोडोंच्या घोषणा म्हणजे तेंवढं वाढीव कर्ज हे प्रत्येक नागरिकांच्या माथ्यावर या मार्च अखेरीस लाखोंच्या कर्जाचा डोंगर उभा राहणार, असे चित्र बजेट मधून निर्माण केल्याच दिसून येत आहे. या घोषणा नव्हे तर फक्त काही मोजक्या उद्योगपती साठी बोली लावण्यात आली आहे. अब्जाधीश हा अजून श्रीमंत आणि व सामान्य नागरिक अजून गरीब होईल अशी व्यवस्था बजेट मधून केली आहे.

असेही मोंडकर यांनी म्हटले आहे. शेतकरी, मत्स्यव्यवसाय, बागायतदार यांच्या अपेक्षांचा भंग या बजेट मधून जाणवतो आहे. महाराष्ट्र राज्यातील विशेषतः आपल्या कोकणात असलेल्या LED मासेमारी, पारंपरिकमत्स्यव्यवसाय, फळ – प्रक्रिया व्यवसाय, बागायतदार, पर्यटन याबाबत ठोस निर्णय घेण गरजेच होते. परंतु त्यातही निर्णय घेण्यात सरकार विलंब करत असल्याचं दिसून येत आहे. गेल्यावेळी प्रमाणे निव्वळ घोषणा करण्यात आल्या असून त्यावर अंमलबजावणी कशी व कोणत्या प्रकारे करणार हे मात्र आढळत नाही. त्यामुळे या बजेट मधून अर्थमंत्र्यांनी सामान्यांच्या खिशाला चटका लावल्याचे दिसत आहे, असेही अरविंद मोंडकर यांनी म्हटले.

You cannot copy content of this page