सावंतवाडी ता.०२-:* एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या पालघर विभागाने शिक्षकांसाठी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च शिक्षण क्षेत्रामधील शिक्षक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठीचे विषय : १. ७५ वा आजादी का अमृतमहोत्सव २. पालघर जिल्ह्यातील कला आणि संस्कृती असे असून चित्र सादर करण्याची अंतिम तारीख १५फेब्रुवारी आहे. चित्र पाठविण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे :
सर्वप्रथम टीचर टॉक ॲप मोबाईलवर डाऊनलोड करावे. त्यामध्ये discussion forum या टॅबवर जाऊन ‘शिक्षकांसाठी चित्रकला स्पर्धा’ निवडावे आणि आपल्या चित्राचा फोटो अपलोड करावा. स्पर्धेसाठीचे नियम व अटी याप्रमाणे : चित्र A3 किंवा A4 साईजच्या कागदावरच काढावे. कागदाच्या मागच्या बाजूला आपले संपूर्ण नाव, शाळा, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमुद करावा. चित्र कोणत्याही स्त्रोतातून कॉपी केले जाऊ नये. परीक्षकांचे नियम अंतिम आणि बंधनकारक राहतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष महेश सावंत यांनी केले आहे.
