कणकवली २ फेब्रुवारी (प्रतिनिधी)-न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवून शरण जात आहे.आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर अटक करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः न्यायालयाचा आदर ठेवून कणकवली न्यायालयात हजर होत असल्याची प्रतिक्रिया आ.नितेश राणे यांनी दिली. भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवली न्यायालया समोर स्वतःहुन हजर झाले.
बुधवारी दुपारी ३ वाजता ते कणकवली न्यायालया समोर हजर झाले.त्याच्या सोबत वकील संग्राम देसाई, वकील राजेंद्र रावराणे, वकील उमेश सावंत,वकील राजू परुळेकर उपस्थित होते. भाजपा पदाधिकारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष समीर नलावडे,दिलीप तळेकर,सभापती मनोज रावराणे,संतोष कानडे,संदीप सावंत,मिलींद साटम उपस्थित होते. दरम्यान, नरडवे नाका व कणकवली न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस सतर्क झाल्याचे दिसून येत होते.न्यायालयात जाणाऱ्या गेटवर सर्वांना अटकाव येत होता.
