बांदा ता.०२-:* मडुरा दशक्रोशीत लहान मोठे अनेक अपघात घडत असतात. त्यात काहीजण गंभीर तर काहीजण अति गंभीर असताना देखील रुग्णवाहिकेविना वेळेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मडुरा दशक्रोशीत सुसज्ज अशी स्वतंत्र रुग्णवाहिकेची गरज असल्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मडुरा, रोणापाल, शेर्ले, पाडलोस, निगुडे, सातोसे, कवठणी, सातार्डा आदी भागात अपघात घडल्यास किंवा नागरिक अचानक आजारी पडल्यास तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. याचा फटका रुग्णांना व नातेवाईकांना बसतो. यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता वाटत असल्याचे नागरिकांच म्हणणे आहे.
