खारेपाटण हायस्कुल मध्ये “तिमिरातून तेजाकडे…” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग

कणकवली ता.०२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज आणि खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने रविवार १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.१ या वेळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले असून भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील राजस्व विभागात अधिकारी असलेले श्री.सत्यवान रेडकर हे या स्पर्धा परीक्षा वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत.

खारेपाटण हायस्कुल व ज्युनियर कॉलेज आणि वरिष्ठ महाविद्यालय यांची स्वतंत्र वेबसाइट नुकतीच शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंती निमित्त खारेपाटण हायस्कुल येथे भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री परशुराम गंगावणे यांच्या शुभहस्ते लॉन्च करण्यात आली होती.तर खारेपाटण महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची सुद्धा सुरवात करण्यात आली असून शासनाच्या विविध सेवेतील पदाधिकारी या वर्गाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. स्पर्धा परीक्षा वर्ग मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असुन भारत सरकारच्या सेवेत उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी क्रांतिकारी चळवळ उभारण्याचे कार्य ते या मार्गदर्शन वर्गातून करत आहेत.

” आपला सिंधुदुर्ग जिल्हा स्पर्धा परीक्षा बाबत उदासीन आहे.ही उदासीनता झटकून टाकावी.व विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षांविषयी आवड निर्माण व्हावी.व त्यातून देशसेवेसाठी भावी अधिकारी निर्माण व्हावेत.याकरिता ” तिमारितातून तेजाकडे ” या चळवळीच्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याचे खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रवीण लोकरे यांनी सांगितले.”

१३/२/२०२२ रोजी खारेपाटण हायस्कुल येथे यु – ट्यूब चॅनेलवरून या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन वर्गाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण हायस्कुलचे पर्यवेक्षक श्री संजय सानप सर यांनी दिली. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व तरुणांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री.प्रकाश अकिवाटे यांनी केले आहे. या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन वर्गाच्या अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक श्री सुबोध देसाई – ८१४९५४०८२६ यांच्याशी संपर्क साधावा.असे खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page