शहरातील विविध समस्यांवर मुख्याधिकारी यांचे शिवसेनेने वेधले लक्ष…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरषरिदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची माजी नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी शहरातील भटक्या कुत्र्यांचे वाढते प्रमाण, डास निर्मुलन, राजवाडा शेजारील रस्त्याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. डांसाचा वाढत्या उत्पत्तीमुळे डास निर्मुलन फवारणी, राजवाडा येथील रस्तावर बीविएम कोट मारण्या संदर्भात बाबू कुडतरकर यांनी मागणी केली.

तर भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना खास करून महिला व लहान मुलांना दशहतीखाली फिरावे लागत आहे. नागरिकांची त्याचबरोबर वारंवारस कुत्र्यांकडून पाठलाग करणे व चावा घेण्यासारखे प्रकार वाढत आहेत. भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण व त्यांच बदोबस्त करण्यासाठी उपाययोजना व्हावी, कोंडवाडा स्थापन करण्यात यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकारी प्रतिक बांदेकर यांनी केली. तर सालईवाडा येथील ड्रेनेजबाबतही लक्ष वेधल. या निवेदनाची दखल घेत कार्यवाही करू असा शब्द मुख्याधिकारी यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुखह माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, दत्ता सावंत, प्रतिक बांदेकर, सुजित कोरगावकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page