प्रथमेश कानवळकर ‘वेंगुर्ला श्री‘चा मानकरी

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील प्रो फिटनेस व्यायामशाळातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत शिवाजी फिटनेसचा प्रथमेश कानळवकर हा ‘वेंगुर्ला श्री‘ चा मानकरी ठरला. ही स्पर्धा ३० जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन प्रायोजक साईश नाटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, विरेंद्र कामत-आडारकर, गणेश अंधारी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

स्पर्धेत मोस्ट इम्पूव्हर रोहन नाईक (सिद्धेश्वर व्यायामशाळा उभादांडा) तर बेस्ट म्युझिक पोजरचा मानकरी हितेंद्र कदम (बी स्ट्राँग बांदा) हा ठरला. ५५ किलो गटात राजेंद्र बंडूवेल, हितेंद्र कदम, योगेश कांबळी, प्रकाश नानेलकर, विशाल जाधव, ६० किलो गटात प्रथमेश कानवळकर, ईश्वर मामलेकर, ओम सावंत, सिद्धेश साळगांवकर, भूषण खोत, ६५ किलो गटात महादेव साळगांवकर, यासीन आजगांवकर, भूषण शिरोडकर, रोहन इझरे, संजय पडवळ, ७० किलो गटात सहदेव नार्वेकर, श्रीपाद अरवारी, सुजय देसाई, योगेश मेस्त्री, ओंकार केळुसकर, ७० किलो गटात रोहन नाईक, रुपेश सावंत, रोहन पोळ, दर्शन गोडकर, सिद्धेश कदम यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे परिक्षण ‘महाराष्ट्र श्री‘ नरेश जाधव व राजेश हिरोजी यांनी केले. बक्षिस वितरण जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व साईश नाटेकर यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page