प्रवीण देसाई यांनी आनंदाश्रम आश्रमाला केली आर्थिक मदत

कणकवली ता.०२-: ओसरगावचे रहिवासी प्रवीण देसाई यांनी आनंदाश्रम अनाव आश्रमाला दहा हजार रुपयांची देणगी दिली. शारदा देसाई या आपल्या परिवारातील महिलेला आश्रमात भरती केले.

तिच्या राहण्याची खाण्यापिण्याची गैरसोय लक्षात घेता ओसरगावचे डॉ. सुचिता मोहिते, आबा मोहिते यांच्यामार्फत व ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे त्यांनी प्रत्यक्षात आश्रमाला भेट देऊन आश्रमाचे प्रमुख बबनकाका परब यांना सदर महिलेची संपूर्ण माहिती दिली. त्या महिलेची होणारी गैरसोय लक्षात घेता आश्रमात कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आश्रमासाठी होणारा खर्च व आपल्या नातेवाईकाला दाखल करून घेतल्याबद्दल आपण काहीतरी आश्रमासाठी केले पाहिजे या भावनेतून प्रवीण देसाई यांनी आश्रमाला रोख स्वरूपात देणगी दिली. कोरोना काळात डॉ. मोहिते गेली दोन वर्ष विनामूल्य आश्रमातल्या रुग्णांची तपासणी करत आहेत त्यांच्या शब्दाखातर व बबली राणे यांनी केलेल्या प्रयत्नातून आश्रमला नेहमीच मदत होत असते त्यावेळी देसाई परिवारातील नातेवाईक उपस्थित होते याप्रसंगी बबन काका परब यांनी ओसरगाव ग्रामस्थांचे आभार मानले.

You cannot copy content of this page