कृती समितीची मागणी
*💫ओरोस ०४-:* दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तसेच या आंदोलनात आतापर्यंत ५४ शेतकऱ्यांचे बळी गेले असून केंद्र सरकारने यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली आहे. शेतकरी विरोधी कायदा विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकार शेती मोडीत काढून त्या जमिनी कार्पोरेट क्षेत्राच्या घशात घालण्या प्रकार सुरू केला आहे. याला विरोध करण्यासाठी आणि शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबर पासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज सोमवारी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपणही शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय चुकीचा असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी जीप समोर मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर थंडीतही पाण्याचा मारा करण्यात आला. हा शासनाकडून चाललेला एक प्रकारचा छळ असल्याची टीका करतानाच या आंदोलन काळात ५४ शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलनावर तात्काळ तोडगा काढावा तसेच शेतकऱ्यांची शेती वाचवावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी शासनाकडे केली आहे.
