त्या व्यक्तीची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी – सरपंच साक्षी सुर्वे

*💫कणकवली दि.०४-:* तळेरे ग्रामपंचायत च्या पाणीपुरवठा नळयोजनेचे पाईप आणि व्हॉल्व चे सातत्याने अज्ञाताकडून नुकसान होत असून याबाबतची तक्रार तळेरे सरपंच साक्षी सुर्वे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. तळेरे ग्रामपंचायतच्या नळयोजनेद्वारे गावातील सर्व वाड्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो.मागील दोन महिन्यांपासून तळेरे गावातील वाघाचीवाडी, गावठणवाडी, चाफार्डेवाडी ला पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनेची पाईपलाईन आणि व्हॉल्वची अज्ञाताकडून तोडफोड केली जात आहे. त्या अज्ञात व्यक्तीचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती व्यक्ती सापडून आली नाही. त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन उचित कारवाई व्हावी अशी तक्रार सरपंच सुर्वे यांनी दिली आहे. त्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page