स्व. माजी हिंदी विभाग हिंदी विभागप्रमुख सीताराम सातवळेकर यांना वाहण्यात आली श्रद्धांजली….

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली…

सावंतवाडी ता.२९-:* श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील माजी हिंदी विभागप्रमुख, प्रभारी प्राचार्य विनायक सीताराम सातवळेकर ऊर्फ आबा सातवळेकर वय 84 यांचे दि २२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. याना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रा. डी डी गोडकर, डॉ बी एन हिरामणी, प्रा एस एस पाटील, डॉ यू एल देठे, प्रा. जी एम शिरोडकर, डॉ एस एस ठाकूर, डॉ. एम पी चौगुले व इतर प्राध्यापक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. विनायक ऊर्फ आबा सातवळेकर हे १९९६ साली महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते आबा म्हणजे एक शिस्तप्रिय , स्वच्छताप्रिय, वक्तशीर, सेवाभावी असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजात सतत हातभार लावला. सर्वांना सहकार्य करणे, अडीअडचणीच्या वेळी उभे राहणे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने एक चांगला मार्गदर्शक हरपला असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना केले.

You cannot copy content of this page