देवगडच्या भाजपा नगरसेवकांनी घेतली केंद्रीयमंत्री नाम.नारायण राणे यांची भेट

कणकवली 29 जानेवारी (प्रतिनिधी)-देवगड नगरपंचायतीवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आठ नगरसेवकांनी भाजपा नेते, केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे, भाजपा आमदार नितेश राणे, सौ.नीलम राणे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या.

कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी जाऊन भाजपाचे नगरसेवक शरद ठुकरुल,प्रणाली माने,तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर,आदया गुमास्ते, मनीषा जामसंडेकर,रुचाली पाटकर,स्वरा कावले यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,पक्ष निरीक्षक समीर नलावडे, भाजपा देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम,देवगड शहर अध्यक्ष योगेश पाटकर,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, देवगड शहर अध्यक्ष योगेश पाटकर, राजा भुजबळ,आदी उपस्थितीत होते.

You cannot copy content of this page