*⚡सावंतवाडी ता.२८-:* मुंबई-गोवा महामार्गावर रंगीला धाब्यासमोर थांबलेल्या परप्रांतीय वाहनचालकांना अडवून पैसे उकळणाऱ्या स्थानिक टोळीला बेदम चोप दिला. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसोबत हा प्रकार घडत होता. दरम्यान, या धाब्यासमोर टोळीला बेदम चोप देण्यात आल. हि घटना आज पहाटे घडली. सावंतवाडी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पैसे उकळणाऱ्या १५ जणांच्या टोळक्याला बेदम चोप दिला. पक्षाचे कार्यकर्ते आहोत, स्थानिक पुढारी आहोत अस सांगून हे १५ ते 20 जाणांच टोळक पैसे उकळायच. हा प्रकार महेंद्र सांगेलकर यांच्या कानावर आला. पर्यटकांच्या सोबत देखील हा प्रकार घडत होता. यातून जिल्ह्याची बदनामी होत होती. त्यामुळे या गंभीर प्रकारची दखल घेत महेंद्र सांगेलकर यांच्या टीमन जात बेदम चोप देत अद्दल घडविली. तालुक्यात या प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे.
वाहनचालकांना अडवून पैसे उकळणाऱ्या टोळीला बेदम चोप
