भाजपा जाती जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांचा आरोप
ओरोस ता.२८-: राज्य सरकार हे स्वतःच्या फायद्यासाठी आलेले सरकार असून गोरगरिबांची लूट करणारे सरकार आहे. सर्व मंत्री स्वतःचे स्वार्थ बघत आहेत. तसेच जनतेचा कोणत्याही प्रकारचा फायदा बघत नाहीत, असा आरोप भाजपा महाराष्ट्र जाती जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांनी आज केला.
भाजपा महाराष्ट्र जाती जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांची जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या दालनात आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुभाष वरवडेकर, चंद्रकांत जाधव, किरण जाधव, मंगेश पावसकर, विष्णू तेंडोलकर, चंद्रकांत वालावलकर, वसंत जाधव, सुधाकर जाधव, गणेश तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमर बोऱ्हाडे यांनी केंद्राच्या कामावर महाराष्ट्रातील जनता खुश आहे. मात्र सध्या राज्य सरकार हे तीन तिगाडा काम बिगाडा आहे. तीन चाकाचे सरकार हे जनतेच्या हिताचं नसून तोट्याच आहे. जनतेचा फायदा काहीही बघत नाही.अनेक घोटाळे या सरकारात होत आहेत. या सरकारच्या काळात सर्व जनता वाऱ्यावर सोडलेली आहे. महाराष्ट्रतील परिस्थिती गंभीर असून या काळात अनुसूचित जातीचे लोक भयभीत तसेच संकटात आहेत. अनुसूचित जमातीच्या लोकांकडे या सरकारचे लक्ष नाहीय, असा आरोप त्यांनी केले. तसेच भारतीय जनता पार्टी हा आपल्या लोकांना किंवा कार्यकर्त्यांना स्वतःच्या आईसारखा जपणारा पक्ष आहे . जात, पात, धर्म पाहत नाही. भाजप पार्टी ही गोरगरिबांची, दिनदुबळ्यांची पार्टी असून या पार्टीमध्ये प्रत्येक माणसाला संधी दिली जाते, असे बोऱ्हाडे यांनी सांगितले.
चौकट
यावेळी बोलताना सभापती अंकुश जाधव यांनी, बोऱ्हाडे यांनी आढावा घेतल्यांनतर आवश्यक त्या ठिकाणी सूचना केल्या. तसेच कामाबाबत समाधान व्यक्त केले. दिन दुबळ्यांसाठी कसे काम करायचे याबाबत सूचना दिल्या. तसेच केंद्र सरकारच्या योजना तळागाळात घेऊन जाण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील मागासवर्गीय युवकांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न करावा याबाबत सूचना दिल्या. राज्यातील सध्याच्या सरकारचे अनेक कारनामे उघड होत आहेत. या सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे जनता भरडली जातेय. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या सुदैवाने जिल्हा परिषद , पंचायत समिती, नगरपालिका ही राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप कडे आहेत.त्यामुळे जिल्ह्यात आमच्या परीने थोडाफार विकास होतोय. मात्र सरकार लक्ष देत नसल्याने दलित जनता, शेतकरी , विद्यार्थी नाराज असल्याचे सांगितले.
