राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची टिका…
*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार सद्य स्थितीत प्रशासक सांभाळत असून, ओमिक्रोन आणि कोरोनामुळे शहरातील जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, काही राजकीय लोकप्रतिनिधी केवळ आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की, विरोधक समस्या सोडविण्याचे सोडून स्वतःच केंद्रीयमंत्री असल्यासारखे वागत आहेत. कोटीच्या घोषणा करून बाता मारत आहेत. विरोधकांनी गेल्या 2 वर्षात शहरासाठी काय केले हे जाहीर करावे. असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या विकासासाठी खूप चांगले काम केले असल्याचे मत देखील त्यानी यावेळी स्पष्ट केले आहे.
