आझाद हिंद संघटनेचे २३ जानेवारीला नाते-महाडला २७ वे वार्षिक अधिवेशन

*⚡कणकवली ता.२२-:* आझाद हिंद संघटनेचे २७ सावे वार्षिक अधिवेशन देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी रविवार २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता महाड तालुक्यातील नाते गावातील श्री क्षेत्र होळीचा मांड येथे होत आहे, अशी माहिती संघटनेचे कोकण प्रदेश संघटक भाई गणपत चव्हाण आणि आयोजक काळूराम आर्डे यांनी पत्रकातून दिली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे-पाटील, संस्थापक सदस्य शशीकांत इंगळे, गजेंद्र अवारे हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. प्रमुख वक्ते म्हणून संग्राम खाडे, रामजी कदम, चंद्रशेखर दाभाडकर, बाळासाहेब खेडेकर हे आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे, महाडचे आमदार भरतशेठ गंगावले, महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप, उद्योजक किशोर धरिया, वाते सरपंच अशोक खातू, उपसरपंच सौ. चैताली खोपडे, गोपिचंद गायकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थित म्हणून संघटनेचे राज्य, प्रदेश, विभागीय पदाधिकारी आहेत. सकाळी ८वाजता राष्ट्रमाता जिजाऊ क्रांती ज्योत रॅली पाचाड येथील जिजाऊ समाधी, पायवा-रायगड येथे शिवराय वंदन, महाड येथील चवदार तळे येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि नाते गावातील पहिले गव्हर्नर सि. डी. देशमुख अशी होणार आहे. तरी या मेळाव्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य समन्वयक रामचंद्र झोरे, सौ. अस्मिता देवळेकर, शेखर गांधी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page