आचरा रामेश्वर वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन

*⚡मालवण ता.२२-: आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर या संस्थेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. यानिमित्त दि. २४ व २५ जानेवारी अशा दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी व कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page