व्हाईस चेअरमनपदी सुभाष सावंत यांची निवड
*⚡कणकवली ता.२२-:* भारत सरकार मान्यता प्राप्त कणकवली अर्बन निधी लिमिटेड या संस्थेच्या रूपाने कणकवली शहर व तालुकावासीयांच्या सेवेत दाखल झाले आहोत ,कणकवली शहरात प्रथमच होणाऱ्या कणकवली अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय संस्थेच्या चेअरमनपदी प्रा.हरीभाऊ भिसे व व्हाईस चेअरमनपदी श्री.सुभाष सावंत यांची निवड झाली आहे. या संस्थेच्या सेक्रेटरीपदी रंजन चव्हाण व ट्रेझररपदी प्रितम पारकर यांची निवड झाली आहे ,या वित्तीय संस्थेमध्ये लखपती योजना ,सुलभ शिक्षण योजना,मुदत ठेव योजना, पेंशन योजना, मासिक ठेव योजना अशा विविध आकर्षक योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे तसेच विविध कर्ज सुविधा देखील यासंस्थेमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत
भारत सरकारच्या निधी कंपनीच्या उद्देशानुसार कामगार वर्ग भाजीविक्रेते, छोटे मोठे व्यावसायिक,उद्योजक, शासकीय अशासकीय सेवेतील सेवा निवृत्त कर्मचारी अशा सर्व स्तरातील लोकांना बचतीची सवय लावणे त्यावर योग्य स्वरूपात व्याजरूपी परतावा देणे व त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्वरित व माफक व्याजदरात बचतीच्या आधारावर व तारण कर्जाची उपलब्धता करून देणे असा संस्था स्थापने मागचा उद्देश आहे
या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सौ. सुरेखा भिसे, सौ. युगंधारा सावंत,सौ.रुपाली चव्हाण ,सौ. प्राची पारकर यांची डायरेक्टर या पदावर निवड करण्यात आली आहे तसेच सल्लागार मंडळामध्ये दीपक बेलवलकर, डॉ. विद्याधर तायशेटे, ऍड.राजेंद्र रावराणे, अशोक करंबेळकर, दामोदर खानोलकर, गणेश जेठे, विजय चव्हाण, प्रसाद घाणेकर, निलेश महेंद्रकर, अमर पारकर, विशाल कामत, सौ.लीना काळसेकर यांची निवड करण्यात आली आहे.
२६ जानेवारी रोजी तहसीलदार आर. जे. पवार आणि प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सत्यनारायण पूजा ठेवण्यात आली आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रा. हरीभाऊ भिसे यांनी केले आहे
