वीज वितरण कंपनीचा कारभार अजबच

मीटर न बसवता ३७ हजारांचे बिल ; पंचायत समितीच्या सर्वसाधारण बैठकीत प्रकार उघड

*⚡सावंतवाडी ता.१२ विनय वाडकर-: आंबोली येथील एका व्यक्तीच्या घरात मीटर न बसवताच महावितरण विभागाने त्याला तब्बल ३७ हजार रुपयाचे बिल दिले असून, त्याने बिल न भरल्याने न बसवलेल्या मीटरचे कनेक्शन तोडले असल्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोगळ कारभार उघड झाला आहे. पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार आज सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उघड करत याबाबत महावितरणचे अधिकारी यांना जाब विचारत, याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आज सावंतवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

यावेळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची कामे रखडली असून, एकही काम अद्याप पर्यंत पूर्ण झाले नाही. याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी आज पंचायत समितीच्या आयोजित मासिक बैठकित केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले रस्ते अद्याप पूर्ण न झाल्याची खंत सदस्य संदीप गावडे यांनी व्यक्त केली असून, महाविकास आघाडी सरकारने अडिज वर्षात जिल्ह्यातील एकही काम देऊ शकले नसल्याचा सांगत हे सरकार जिल्ह्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी तालुक्यातील अंगणवाडी आणि शाळा मधील लाईट बिल थकित असून, अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविकांच ही लाईट बिल भरत आहेत. त्यामुळे अंगणवाडीचे विज बिल भरण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी अशी मागणी या मासिक बैठकीत करण्यात आली आहे.

यावेळी नाणोस गावात बिबट्याचे वास्तव्य असून, तेथील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करून देखील यावर वनविभागाने कोणत्याही प्रकारची उपययोजना करण्यात आली नाही. यावेळी त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथील सरपंच सोबत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली.

You cannot copy content of this page