भरधाव इनोव्हा कारची पदाचाऱ्याला धडक

खारेपाटण संभाजीनगर येथे अपघात; कारचालक पसार

*⚡कणकवली ता.१२-: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे सकाळी ८.४५ वा.च्या सुमारास मुंबईहु गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका स्थानिक पादाचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने खारेपाटण गुराववाडी संभाजी नगर येथील रहिवाशी विठ्ठल रामचंद्र गुरव (वय – ५८ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर इनोव्हा गाडीचा चालक हा फरार झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत,ग्रा प सदस्य महेंद्र गुरव तसेच संभाजी नगर खारेपाटण येथील युवकांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघातग्रस्त गंभीर जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे नेले आहे.दरम्यान या अपघातातील जखमी विठ्ठल गुरव यांचा डावा हात आणि पाय फॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच इनोव्हा गाडीचा चालक हा पदाचाऱ्याला ठोकून गाडी घेऊन पसार झाला. मात्र मुंबई – गोवा महामार्ग नडगिवे येथे सदर इनोव्हा गाडी रस्त्याच्या कडेला सोडून तेथून दुसऱ्या गाडीने पळ काढून पसार झाला.खारेपाटण आऊट पोस्ट व चेक पोस्टचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे व पराग मोहिते यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली अपघातग्रस्त इनोव्हाचा पंचनामा करून ताब्यात घेतली. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस ए. बी. सावंत, जे. बी. डिसोजा ,एम.एस. कमाणे आदी कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते. मुंबई – गोवा राष्ट्रीय मगामार्गावर खारेपाटण येथे संभाजी नगर जवळील मधूबन हॉटेल येथे असलेले धोकादायक वळण तसेच महामार्गाला थेट जोडला गेलेला कोल्हापूर राज्यमार्ग हे त्याला कारणीभूत असून सध्या या ब्रिजचे काम सुरू असून जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. दरम्यान या अपघातातील इनोव्हा गाडीचा फरार चालकाचा तसेच अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे आणि पराग मोहिते करीत आहेत.

You cannot copy content of this page