जानवलीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात केले उपचार
कणकवली ता.१२-: कणकवली शहरातील उड्डाणपुलावर म्हैशीला अज्ञात वाहनचालकाची जोरदार धडक बसली. या धडकेत म्हैशीच्या पायाला व मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. हा प्रकार गांगो मंदिर समोरील उड्डाणपुलावर सकाळच्या सुमारास घडला. हा घडलेल्या प्रकाराची माहिती नागरिकांनी नगरपंचायतीला दिली. त्यानंतर न.पं.च्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या म्हैशीला जेसीबीच्या सहाय्याने उचलून ट्रक्टर भरून जानवलीतील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून तिच्यावर उपचार केले.
त्यामुळे त्या म्हैशीला जीवदान मिळाले आहे. कणकवली नगरपंचायत ठेकेदार मिथून ठाणेकर, विशाल होडावडेकर, मुन्ना भंडारी, राजेंद्र तांबे, सचिन कदम, धनंजय कदम, लक्ष्मण तांबे, प्रणव तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर व पोलीस कर्मचारी यांनी मदत कार्य केले. मुक्या प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी न.प.कर्मचार्यांनी दाखवलेल्या तत्परेबद्दल त्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
