Headlines

तनुश्री मसुरकर राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीची मानकरी

*⚡कणकवली ता.१२-:* माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेतील कुमारी तनुश्री प्रसाद मसुरकर हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये ९०% गुण संपादन करून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृतीची मानकरी ठरली आहे.

राज्यगुणवत्ता यादीत २२ वी तर सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण शिष्यवृती यादीत चतुर्थ क्रमांक पटकावला असून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कुमारी तनुश्री हिला प्रशालेतील सर्व शिक्षकांचे तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली वसाहत प्रशालेतील सर्व शिक्षकांचे आणि आई वडिलांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असून तिच्या या सुवर्णमय यशाबद्दल क ग शि प्र मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, सरचिटणीस सुरेश सावंत, उपाधक्ष्य पी. डी. सावंत आणि पदाधिकारी तसेच शालेय समिती खजिनदार गणपत सावंत आणि पदाधिकारी, प्रशाला मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या*.

You cannot copy content of this page