ज़िल्हा मनसेच्यावतीने वाचनालयाला पन्नास पुस्तके भेट

स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य

कुडाळ ता.१२-: आपल्या सामाजिक उपक्रमांनी नेहमीच जनसेवेत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने केरवडे (ता. कुडाळ) येथील श्री देव जगन्नाथ वाचनालयाला स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्रावर आधारित पन्नास पुस्तके भेट देण्यात आली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम केरवडे येथील श्री देव जगन्नाथ मंदिरात पार पडला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब, सुबोध परब , श्री देव जगन्नाथ वाचनालयाचे संचालक विलास परब, मनोहर परब, केरवडे देवस्थान प्रमुख दिलीप परब, दत्ताराम परब, न्हानू परब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परब यांनी केले. तर आभार विलास परब यांनी मानले. मनसेच्यावतीने गतवर्षी कुडाळ येथील टोपीवाला वाचनालयाला स्पर्धा परीक्षावर आधारीत पंचवीस हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट देण्यात आली होती. मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुकाभरात कौतुक होत असून वाचनालयामार्फत विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

You cannot copy content of this page