*⚡सावंतवाडी ता.१०-:* डेगवे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी अभय देसाई हिने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून तालुक्यात २१ वा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
गौरीच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, सर्व कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती, सर्व संस्था पदाधिकारी आणि डेगवे ग्रामस्थ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
