*⚡कणकवली ता.०९-:* सिंधुदुर्गात कोरोना आपले हातपाय पसरू लागला असून आरोग्य विभागाने कोरोना तपासणी यंत्रणा वाढविली आहे.कणकवली पटवर्धन चौकात सुरू असलेल्या कोरोना तपासणीमध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे आता शहरात सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कणकवली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कणकवली नगरपंचायतीने पुढाकार घेत आरोग्य विभाग यांच्या मदतीने पटवर्धन चौक येथे कोरोना तपासणी पथक 7 जानेवारी पासून तैनात करण्यात आले आहे. त्यामध्ये रॅपिड व आरटीपीसीआर तपासणी करण्यात येते आहे.
यावेळी आरोग्य कर्मचारी नीलम कांबळे ,नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, विनोद सावंत रमेश कदम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सकाळ पासून दुपारपर्यंत 52 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये एक जण शहरात राहणारा आहे व दुसरा मुंबईवरून गावी दाखल झालेला असल्याने कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.
