*⚡कणकवली ता.०८-: पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण आयोजित भव्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत सहस्रधारा खारेपाटण हा संघ अंतिम विजेता ठरला असून के सी सी खारेपाटण या संघाने उपविजेता चषक पटकावला आहे.
खारेपाटण येथील केदारेश्वर मैदानावर सलग तीन दिवस सुरु असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत सुमारे २० संघानी सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेच्या अंतिम विजेता संघाला रोख रुपये १०,०२२ /- व आकर्षक चषक खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते देण्यात आला.तर उपविजेता के सी सी संघाला रोख रुपये ५,०२२ /- व आकर्षक चषक खारेपाटण खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. तर मालिकविर हा चषक सहस्रधारा खारेपाटण चा खेळाडू ओंकार याला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम यांच्या शुभहस्ते देण्यात आला.व उरकृष्ट फलंदाज रुपेश याला कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांच्या हस्ते चषक देण्यात आला.उत्कृष्ट गोलंदाज हा चषक के सी सी खारेपाटण या संघाचा खेळाडू सलमान याला खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला शेर्पे माजी सरपंच रामा पांचाळ,खारेपाटण ग्रा प सदस्य योगेश पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,युवा कार्यकर्ते संजय कोळसुलकर,आदिनाथ शेट्ये आदी मान्यवर उवस्थित होते.
या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पंचशील विकास मंडळ खारेपाटण मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री विनोद शंकर पाटणकर तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पंचशील विकास मंडळ खारेपाटण ग्रामीण शाखेचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी पुरस्कृत केले होते.तर स्पर्धेचे चषक श्री संतोष शंकर जुवाटकर व श्री मोहन कमळया कांबळे यांनी दिले होते. तसेच स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू ग्रा प सदस्य श्री योगेश पाटणकर यानी दिले होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण चे कार्यकर्ते राहुल पाटणकर,भूषण गोवळकर,भरत पाटणकर,सागर पोमेडकर,बाळकृष्ण पाटणकर,प्रथमेश कदम,ललित पाटणकर,हर्षल कदम,विराज पाटणकर,दीपक गोवळकर, कुणाल पाटणकर,धीरज जुमलेकर, रवींद्र पाटणकर,आशिष पोमेडकर,संदीप पाटणकर अशोक पाटणकर आदी कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
