खास.अरविंद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन ,वाटप व डायरी वाटप

*⚡कणकवली ता.०८-: माजी केंद्रीय मंत्री,शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभवडे ग्रामस्थ संघ व गुरुकुल कुंभवडे यांच्यावतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन ,वाटप व डायरी वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना कुंभवडे ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष प्रमोद कृपाळ म्हणाले, गावातल्या इतिहासाच्या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.यासाठी दिनदर्शिकेच्या मार्फत हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेत असताना या गावातील सामाजिक , राजकीय, धार्मिक क्षेत्रात काम करत गावचे नाव उज्ज्वल करूनआदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी सरपंच आप्पा तावडे, कुंभवडे ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष प्रमोद कॅपाळ .विजय सावंत, मधुकर सावंत, गुरुनाथ पेडणेकर,दिलीप कुमार सावंत,गुरुकुलचेउपमुख्याध्यापक,शिक्षकवृंद ग्रामस्थ , विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page